भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस चक्रावले

घुसखोरी फक्त सीमेपुरती मर्यादित नाही. घुसखोरांना सीमावर्ती भागापासून दूर असलेल्या भारतीय शहरांमध्ये स्थायिक होण्यास मदत करण्यात एजंट महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली पोलिस गस्तीवर असताना शहरातील पटेल चौक ते आमराई रस्त्यावर संशयित आढळला. यावेळी त्याची सुरुवातीला चौकशी केली असता खिशातील आधारकार्ड काढत दिल्लीतील आमीर शेख असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या बोलण्यातून पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. यानंतर त्याने ढाकामधील असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असता तो बांगलादेशी असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत घुसखोरी केल्याचे समोर आले. इतकेच नव्हे, तर बांगलादेशात एका राजकीय पक्षाशी संबंधित होता